स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची नववर्ष स्वागत ठेव योजना सुरू

रत्नागिरी : करोनामुळे विविध पतसंस्था आर्थिक अडचणीत आलेल्या असताना रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने मात्र सर्व अडचणींवर मात करत ठेवीदारांना आकर्षित करणाऱ्या नवनव्या योजना आखल्या आहेत. आजपासून पतसंस्थेनेच नववर्ष स्वागत योजना जाहीर केली आहे.

या योजनेत १५ ते १८ महिने मुदतीच्या स्वरूपांजली ठेव योजनेत सर्वसामान्य ठेवीदारांसाठी ७.१५ टक्के, ज्येष्ठ नागरिक व महिला ठेवीदारांसाठी ७.३० टक्के, तर १९ ते ३६ महिने मुदतीच्या सोहम ठेव याजनेत सर्वसामान्य ठेवीदारांसाठी ७ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक व महिला ठेवीदारांसाठी ७.१० टक्के व्याजदर घोषित केला आहे. पतसंस्थेच्या रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी शहर, मारुती मंदिर, कोकणनगर, पावस, जाकादेवी, खंडाळा, कुवारबाव, चिपळूण, पाली, साखरपा, देवरूख, नाटे, मालगुंड, लांजा, राजापूर, पुण्यात कोथरूड येथे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड-जामसंडे येथे शाखा आहेत. त्या सर्व शाखांमध्ये ठेवी ठेवता येणार आहेत.

आजअखेर पतसंस्थकडे २१८ कोटींच्या ठेवी जमा असून चालू आर्थिक वर्षात १७ कोटींच्या ठेवी वाढल्या आहेत. करोनाची परिस्थिती असूनही ठेववाढीचे हे प्रमाण लक्षणीय आहे. वाढत्या ठेवींबरोबर कर्जव्यवहार आणि गुंतवणुकांमध्येही वाढ झालेली असून संस्थेचा स्वनिधी २६ कोटी ८७ लाखापर्यंत पोचला आहे. पतसंस्थेने सीडी रेशोही योग्य प्रमाणात राखला आहे.

संस्थेने ठेवींची सुरक्षितता आणि विश्वासार्हता याला अनन्यसाधारण महत्त्व दिले असून गेली २९ वर्षे मार्गक्रमण केले. जनमानसात पतसंस्थेबद्दल असलेली स्वच्छ प्रतिमा, ग्राहकांचा स्नेह, विश्वास या बळावर संस्थेची वाटचाल अधिक उत्तम पद्ध मार्गस्थ होत असल्याचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
……..

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply