रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१७ फेब्रुवारी) करोनाचे नवे २३, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ रुग्ण आढळले. रत्नागिरीत ६, तर सिंधुदुर्गात ४ रुग्ण करोनामुक्त झाले.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे २३ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी २, तर खेड तालुक्यात १३ बाधित आढळले (एकूण १७). रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार खेड तालुक्यात ३, चिपळूणला १, तर संगमेश्वर तालुक्यात २ बाधित रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून २३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९७६४ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ४०२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७५ हजार ७९४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ८७ आहे. त्यातील सर्वाधिक १८ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर २९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ६ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९२८९ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.१३ टक्के आहे. जिल्ह्यात आज नव्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची एकूण संख्या ३५८ एवढीच असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६६ टक्के आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गात आज (१७ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे ७ करोनाबाधित आढळले, तर ४ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६३७५ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६०२९ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७३ झाली आहे.
Follow Kokan Media on Social Media



