Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत करोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ

Advertisements

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांत आज (५ एप्रिल) पुन्हा एकदा करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या काल कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. पण आज पुन्हा नवे १३२ रुग्ण आढळल्याने दिलासा अल्पजीवी ठरला. शिवाय आज दोघांच्या मृत्यूचीही नोंद झाली. सिंधुदुर्गात ७७ रुग्ण आढळले.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती

आज जिल्ह्यातील गुहागर आणि मंडणगड तालुके वगळता इतर सात तालुक्यांमध्ये रुग्ण आढळले असून आजही सर्वाधिक ३१ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात आढळले. आज ५४ रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी २८, दापोली २९, खेड १२, चिपळूण १९, संगमेश्वर ६, लांजा १८ आणि राजापूर १ (एकूण ११३). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी, खेड आणि संगमेश्वर प्रत्येकी ३, चिपळूण ९, लांजा तालुक्यात १ (एकूण १९) बाधित आढळले. (दोन्ही मिळून १३२). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ११ हजार ५७० झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ६८७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख एक हजार दोन हजार ९१३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५९९ आहे. त्यातील सर्वाधिक ११७ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून २९३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ५४ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या दहा हजार ४१० झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज पुन्हा कमी झाला असून तो ८९.९७ टक्के झाला आहे.

जिल्ह्यात आज दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. दापोली तालुक्यातील ८५ वर्षांचा पुरुष आणि रत्नागिरी तालुक्यातील ५३ वर्षीय महिला यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ३८० असून मृत्युदर ३.२८ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्गात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आजही वाढली आहे. आहे. आज (५ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार ७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ७ हजार ४७५ एवढी झाली आहे. आज ३३ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६ हजार ६०६ झाली आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्याही वाढू लागली असून आज ती ६७५ झाली आहे. आज नव्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १८८ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version