रत्नागिरी जिल्ह्यात नवे १७२, सिंधुदुर्गात ११७ करोनाबाधित, सहा जणांचा मृत्यू

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत करोनाच्या रुग्णांची वाढ सुरूच आहे. आज (७ एप्रिल) रत्नागिरीत १७२, सिंधुदुर्गात ११७ नवे रुग्ण आढळले. रत्नागिरीत चौघांचा, सिंधुदुर्गात दोघांचा मृत्यू नोंदविला गेला.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती

आज मंडणगड वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये बाधित रुग्ण आढळले. सर्वाधिक ५२ रुग्ण चिपळूण तालुक्यातील आहेत. आज ४८ रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ३२, खेड १७, गुहागर ११, चिपळूण ४३, संगमेश्वर २४, लांजा ३, राजापूर २. (एकूण १३२). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ७, दापोली आणि राजापूर प्रत्येकी २, खेड ८, गुहागर २, चिपळूण आणि संगमेश्वर प्रत्येकी ९, लांजा ३. (दोन्ही मिळून ४०). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ११ हजार ८८० झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ३८८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख तीन हजार ६०१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६९६ आहे. त्यातील सर्वाधिक १३३ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ३०७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ४८ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या दहा हजार ५१६ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज पुन्हा कमी झाला असून तो ८८.५२ टक्के झाला आहे.

जिल्ह्यात आज तीन पुरुष आणि एका महिलेचा रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात मृत्यू झाल्याची नोंद झाली. त्यातील दोघांचा मृत्यू काल, तर दोघांचा आज झाला आहे. त्यांचा तपशील असा – रत्नागिरी – ६० आणि ६५ वर्षीय पुरुष, संगमेश्वर – ७० वर्षीय महिला. खेड ६८ वर्षीय पुरुष.त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ३८६ असून मृत्युदर ३.२५ टक्के झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्गात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आजही वाढली आहे. आज (७ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार ११७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ७ हजार ६६१ एवढी झाली आहे. आज ४८ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६ हजार ६७१ झाली आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्याही वाढू लागली असून आज ती ७९२ झाली आहे. आज वैभववाडी तालुक्यातील दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात सांगुळवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष आणि वैभववाडी येथील ३५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १९२ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply