सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे ५२३ करोनाबाधित

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (६ मे) दुपारी १२ वाजेपर्यंत नवे ५२३ करोनाबाधित आढळले आहेत. आज बरे झालेले २४९ रुग्ण घरी गेले, तर ९ जणांची करोनाविरुद्धची लढाई अयशस्वी ठरल्याची नोंद झाली.

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ११ हजार ७६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात ४ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या ५२३ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १५ हजार ६२६ झाली आहे. आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ६६, दोडामार्ग – ६३, कणकवली – ५०, कुडाळ – १०४, मालवण – ८१, सावंतवाडी – ६०, वैभववाडी – १८, वेंगुर्ले ८०, जिल्ह्याबाहेरील – १.

जिल्ह्यात सर्वाधिक ८११ सक्रिय रुग्ण कुडाळ तालुक्यात, तर त्याखालोखाल कणकवली तालुक्यात ६४८ रुग्ण आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ५३१, दोडामार्ग २९६, मालवण ६७७, सावंतवाडी ५४४, वैभववाडी १७०, वेंगुर्ले ४१२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ६२. सक्रिय रुग्णांपैकी ३२१ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी २८० रुग्ण ऑक्सिजनवर तर ४१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात नऊजणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३९३ झाली आहे. आजचे तालुकानिहाय मृत्यू असे – कणकवली १, कुडाळ ३, सावंतवडी २, वैभववाडी १, वेंगुर्ले २.

जिल्ह्यातील तालुकानिहाय मृत्यूची आजपर्यंतची एकूण संख्या अशी – देवगड ४४, दोडामार्ग – १०, कणकवली – ९०, कुडाळ – ६३, मालवण – ५१, सावंतवाडी – ६७, वैभववाडी – ३९, वेंगुर्ले – २७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.

जिल्ह्यात कणकवलीतील बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह (१३) आणि दोडामार्ग आयटीआय येथील कोविड केअर सेंटर (३०) येथे रुग्णांना दाखल करण्यासाठी बेड शिल्लक आहेत. इतरत्र बेड शिल्लक नाहीत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply