सिंधुदुर्गात नवे ५७६ करोनाबाधित

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, १३ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५७६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर २४४ जण करोनामुक्त झाले.

सध्या जिल्ह्यात ६ हजार ९०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दुबार १० जणांच्या केलेल्या तपासणीसह ५७६ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ६८, दोडामार्ग – १५, कणकवली – ८९, कुडाळ – ९०, मालवण – ११६, सावंतवाडी – ९५, वैभववाडी – १९, वेंगुर्ले – ७४.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ९४२, दोडामार्ग २४६, कणकवली ११४९, कुडाळ १४५७, मालवण १३०९, सावंतवाडी ८५२, वैभववाडी ३०२, वेंगुर्ले ६१७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ३०. सक्रिय रुग्णांपैकी ३४० रुग्ण ऑक्सिजनवर तर ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ८६७ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड १, कणकवली २, कुडाळ ४, मालवण ३.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड ११९, दोडामार्ग – २६, कणकवली – १७५, कुडाळ – १३४, मालवण – १५४, सावंतवाडी – १२८, वैभववाडी – ५९, वेंगुर्ले – ६७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ५.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply