कळंबस्ते ग्रामस्थांच्या मदतीला धावले मुंबईकर

रत्नागिरी : कळंबस्ते (ता. संगमेश्वर) येथील मलदेवाडीतील मुंबईकर चाकरमानी ग्रामस्थांच्या मदतीला धावले आहेत. करोनाच्या काळात आवश्यक असलेली विविध उपकरणे आणि साधनांचे त्यांनी घरोघरी वाटप केले.

कोकणातील इतर कोणत्याही गावांप्रमाणेच मलदेवाडीतील अनेक चाकरमानी मुंबईत आहेत. त्यांची दोन विकास मंडळेही आहेत. त्यामधील तरुणांनी एकत्र येऊन गावासाठी करोनाच्या काळात काहीतरी करायचे ठरविले. महामारीच्या संकटकाळात समाजाचे आपण काही देणे लागतो, याच भावनेतून मुंबईकरांनी ग्रामस्थांसाठी १५० वाफेची यंत्रे, ऑक्सिमीटर, थर्मामीटर, सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्ह्ज, फेसशील्ड, पीपीई किट तसेच इतर साहित्याचे वाटप ग्रामस्थांना केले. करोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी सर्वांत पहिला उपाय म्हणजे गरम पाण्याची वाफ हे लक्षात घेऊन वाफेच्या यंत्रांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

करोनाकाळाच्या सुरुवातीला याच ग्रामस्थांनी मुंबईकरांना सर्व नियम पाळून गावात प्रवेश दिला होता. त्याच याच ग्रामस्थांना करोनाशी सामना करावा लागत आहे. त्याकरिता आपल्या बांधवांना साथीच्या आजारातून मुक्त करण्यासाठी ग्रामस्थांच्या बाजूने मुंबईकरसुद्धा लागेल ते सहकार्य करण्यासाठी उभा ठाकला आहे. त्यातूनच विविध साहित्य देण्यात आले. याशिवाय जनजागृतीकरिता गावात सूचना फलक लावण्यात आले. ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, सर्दी-ताप-खोकला असे मोसमी आजार आहेत, घाबरण्याचे काही कारण नाही. योग्य खबरदारी घेतल्यास, काळजी घेतल्यास तो आजार नक्की बरा होतो. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबईकरांनी सर्व ग्रामस्थांना केले आहे.

मुंबईतील तरुण मंडळींनी सगळ्यांकडून मदत जमा केली आणि गावासाठी पाठवली. त्यामुळे ग्रामस्थही समाधानी आहेत.

(संपर्क – 86527 84547)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply