सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१५ जुलै) नव्या करोनाबाधितांपेक्षा दुपटीहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले.
आज करोनाचे नवे १५१ रुग्ण आढळले. आजपर्यंतच्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४५ हजार ५४५ झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत ४१ हजार २७२ रुग्ण करोनामुक्त झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ३३२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज दुबार तपासणी केलेल्या एका रुग्णासह नवे १५१ करोनाबाधित रुग्ण आढळले.
सध्या जिल्ह्यात ३ हजार १२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – १०, दोडामार्ग – ४, कणकवली – २३, कुडाळ – १७, मालवण – ३२, सावंतवाडी – ४१, वैभववाडी – ६, वेंगुर्ले – १७.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४६२, दोडामार्ग ९५, कणकवली ५८४, कुडाळ ६८५, मालवण ४९३, सावंतवाडी ३९६, वैभववाडी १३८, वेंगुर्ले २४४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २४. सक्रिय रुग्णांपैकी २०२ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात ५ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार १५० झाली आहे. आज मृत्यू झालेल्या ५ आणि आज नोंद झालेल्या आधीच्या एका मृताचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड १, कुडाळ १, मालवण १, सावंतवाडी १, वेंगुर्ले २.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५२, दोडामार्ग – ३४, कणकवली – २३०, कुडाळ – १७६, मालवण – २३९, सावंतवाडी – १५४, वैभववाडी – ६९, वेंगुर्ले – ९०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.
………….

