रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये घट

रत्नागिरी : करोनाच्या दुसऱ्या लाटेत रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आज (१५ जुलै) प्रथमच तीन हजाराच्या खाली आली. आज सलग पाचव्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक आहे.

आज ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे करोनामुक्तांची टक्केवारी ९२.२२ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर १६९, अँटिजेन चाचणी १८४ (एकूण ३५३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६७ हजार ६०० झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ७.२९ असून एकूण रुग्णवाढीचा दर १३.१८ टक्के आहे.

आज दोन हजार ९७१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात एक हजार ४४१ गृह विलगीकरणात, तर एक हजार ५३० संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी ३६१ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.

आज चार हजार ४९२ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ५२ हजार ९६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात ३९१ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ६२ हजार ३३९ झाली आहे.

जिल्ह्यात यापूर्वीच्या ४ आणि आजच्या २ अशा ६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ९२९ झाली आहे. मृत्युदर २.८५ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ६३६, खेड १७४, गुहागर १४४, दापोली १६७, चिपळूण ३७२, संगमेश्वर १७६, लांजा ९९, राजापूर ११८, मंडणगड २९. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १९२९).

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply