सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६५ नवे करोनाबाधित, ८२ करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२२ जुलै) १६५ नवे करोनाबाधित आढळले, तर त्याहून निम्मे म्हणजे ८२ रुग्ण करोनामुक्त झाले.

आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे ८२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ४२ हजार ५३२ झाली आहे.

आज जिल्ह्यात दुबार तपासणी केलेल्या २ जणांसह नवे १६५ करोनाबाधित आढळले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ४६ हजार ९२७ झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात ३ हजार १९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – २९, दोडामार्ग – १, कणकवली – १५, कुडाळ – ३१, मालवण – २८, सावंतवाडी – २९, वैभववाडी – १६, वेंगुर्ले – १३, जिल्ह्याबाहेरील १.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४३४, दोडामार्ग ७८, कणकवली ५९५, कुडाळ ७३१, मालवण ५६२, सावंतवाडी ४१८, वैभववाडी १४४, वेंगुर्ले २१५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २०. सक्रिय रुग्णांपैकी १४२ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात आधीच्या ८ आणि आजच्या ४ अशा १२ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार १९६ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड १, कणकवली ३, मालवण १, सावंतवाडी ७.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५५, दोडामार्ग – ३४, कणकवली – २४२, कुडाळ – १८०, मालवण – २४५, सावंतवाडी – १६८, वैभववाडी – ७१, वेंगुर्ले – ९५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply