रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांपेक्षा नवबाधितांची संख्या अधिक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२२ जुलै) करोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा १०१ नवे आढळले. आज नवे १७९ रुग्ण बरे झाले, तर २८० नवे रुग्ण आढळले.

आतापर्यंत जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६४ हजार ६९४ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९३.२३ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – १४७, अँटिजेन – १३३ (एकूण २८०). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६९ हजार ३९५ झाली आहे.

आज दोन हजार ७३५ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले दोन हजार ७०, तर लक्षणे असलेले ६६५ रुग्ण आहेत. एक हजार १७९ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ८०२, डीसीएचसीमधील ३८२, तर डीसीएचमध्ये २८३ रुग्ण उपचार घेत आहेत. बाधितांपैकी २४३ जण ऑक्सिजनवर, ९९ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज ७ रुग्णांचा मृत्यू झाला. आजचा मृत्युदर २.८५ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ९८० झाली आहे.

आज आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या दोन हजार ८२ नमुन्यांपैकी एक हजार ९३५ अहवाल निगेटिव्ह, तर १४७ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या तीन हजार ५२० पैकी तीन हजार ३८७ अहवाल निगेटिव्ह, तर १३३ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ६५ हजार ८०९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – मंडणगड २९, दापोली १७४, खेड १७७, गुहागर १४७, चिपळूण ३८०, संगमेश्वर १७८, रत्नागिरी ६५७, लांजा १०३, राजापूर १२१, इतर जिल्ह्यातील १३. दुबार मोजणी १. (एकूण १९८०).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply