सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ जुलै) १५३ नवे करोनाबाधित आढळले, तर ४७३ रुग्ण करोनामुक्त झाले. आजपर्यंतच्या करोनामुक्तांची एकूण संख्या ४३,००५ झाली आहे.
आज जिल्ह्यात दुबार तपासणी केलेल्या ९ जणांसह नवे १५३ करोनाबाधित आढळले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ४७ हजार ७१ झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सध्या जिल्ह्यात २८५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – १३, दोडामार्ग – ३, कणकवली – २८, कुडाळ – ४१, मालवण – १३, सावंतवाडी – २०, वैभववाडी – ११, वेंगुर्ले – १४, जिल्ह्याबाहेरील १.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३६९, दोडामार्ग ७१, कणकवली ५०९, कुडाळ ६५९, मालवण ४५४, सावंतवाडी ४२७, वैभववाडी १४६, वेंगुर्ले २०६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १८.
सक्रिय रुग्णांपैकी १५१ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात आधीच्या १ आणि आजच्या ८ अशा ९ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १२०५ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – कणकवली ३, मालवण १, वैभववाडी १, कुडाळ २, कोल्हापूर १, दोडामार्ग १
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५५, दोडामार्ग – ३५, कणकवली – २४५, कुडाळ – १८२, मालवण – २४६, सावंतवाडी – १६८, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ७.
Follow Kokan Media on Social Media

