रत्नागिरीत आज २३६ करोनामुक्त, १५९ नवे बाधित; एकही मृत्यू नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२३ जुलै) २३६ जण करोनामुक्त झाले असून, १५९ नवे करोनाबाधित आढळले. आतापर्यंत जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६४ हजार ९३० झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९३.३५ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – १२१, अँटिजेन – ३८ (एकूण १५९). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६९ हजार ५५४ झाली आहे. आज २६५८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले १९८०, तर लक्षणे असलेले ६७८ रुग्ण आहेत. ११३४ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ७८६, डीसीएचसीमधील ३९२, तर डीसीएचमध्ये २८६ रुग्ण उपचार घेत आहेत. बाधितांपैकी २३७ जण ऑक्सिजनवर, १०३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज जिल्ह्यात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजचा मृत्युदर २.८५ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १९८० आहे.

आज आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ७८५ नमुन्यांपैकी ६६४ अहवाल निगेटिव्ह, तर १२१ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १०४६ पैकी १००८ अहवाल निगेटिव्ह, तर ३८ पॉझिटिव्ह आले. आज जिल्ह्यातल्या एकूण चाचण्यांचं प्रमाण खूपच कमी असून, अतिवृष्टी हे त्यामागचं कारण असावं.

आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ६७ हजार ४८१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – मंडणगड २९, दापोली १७४, खेड १७७, गुहागर १४७, चिपळूण ३८०, संगमेश्वर १७८, रत्नागिरी ६५७, लांजा १०३, राजापूर १२१, इतर जिल्ह्यातील १३. दुबार मोजणी १. (एकूण १९८०).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply