सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनामुक्तांची संख्या नवबाधितांहून निम्मीच

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२५ जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १६२ नवे करोनाबाधित आढळले, तर त्यापेक्षा सुमारे निम्मे म्हणजे ८३ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची एकूण संख्या ४३ हजार १७६ झाली आहे.

आज नवे १६० करोनाबाधित आढळले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ४७ हजार ३९३ झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात ३ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – १०, दोडामार्ग – ३, कणकवली – २४, कुडाळ – ६१, मालवण – १३, सावंतवाडी – १९, वैभववाडी – २४, वेंगुर्ले – ८.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३९०, दोडामार्ग ७०, कणकवली ५२१, कुडाळ ७५४, मालवण ४८४, सावंतवाडी ४०२, वैभववाडी १६५, वेंगुर्ले १९३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २१. सक्रिय रुग्णांपैकी १४७ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २१५ झाली आहे. आजच्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड २, कुडाळ २, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५७, दोडामार्ग – ३५, कणकवली – २४८, कुडाळ – १८६, मालवण – २४६, सावंतवाडी – १६८, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ८.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply