रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ जुलै) करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या नवबाधितांपेक्षा किंचित घटली आहे. अधिक आहे. आज नवे १९० रुग्ण बरे झाले, तर २०५ नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६५ हजार ३१७ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९३.४४ झाली आहे.
आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – १४६, अँटिजेन – ५९ (एकूण २०५). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६९ हजार ८९९ झाली आहे.
आज दोन हजार ५८६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ८५७, तर लक्षणे असलेले ७२९ रुग्ण आहेत. एक हजार १०१ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ७०४, डीसीएचसीमधील ३९४, तर डीसीएचमध्ये ३३५ रुग्ण उपचार घेत आहेत. बाधितांपैकी १८७ जण ऑक्सिजनवर, ९३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज ८ रुग्णांचा मृत्यू झाला. आजचा मृत्युदर २.८६ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ९९६ झाली आहे.
आज आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या तीन हजार ५१४ नमुन्यांपैकी तीन हजार ३६८ अहवाल निगेटिव्ह, तर १४६ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन हजार २८० पैकी दोन हजार २२१ अहवाल निगेटिव्ह, तर ५९ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ७७ हजार ४९९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – मंडणगड २९, दापोली १७९, खेड १७८, गुहागर १४८, चिपळूण ३८२, संगमेश्वर १८०, रत्नागिरी ६६६, लांजा १०६, राजापूर १२७, इतर जिल्ह्यातील १३. दुबार मोजणी १. (एकूण १९९६).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
