सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे ३१ करोनाबाधित, १०८ करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२६ जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १३१ नवे करोनाबाधित आढळले, तर १०८ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची एकूण संख्या ४३ हजार २८४ झाली आहे.

आज एका दुबार तपासणीसह नवे १३१ करोनाबाधित आढळले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ४७ हजार ५२३ झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात ३ हजार १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – १३, दोडामार्ग – ७, कणकवली – ३४, कुडाळ – २०, मालवण – २४, सावंतवाडी – १३, वैभववाडी – १४, वेंगुर्ले – ४. जिल्ह्याबाहेरील १.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४०३, दोडामार्ग ७२, कणकवली ५०६, कुडाळ ७७०, मालवण ५०३, सावंतवाडी ३८४, वैभववाडी १७१, वेंगुर्ले १८७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २२. सक्रिय रुग्णांपैकी १४५ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात कालच्या १ आणि आजच्या ३ अशा चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २१९ झाली आहे. आजच्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – कणकवली २, मालवण १, सावंतवाडी १.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५७, दोडामार्ग – ३५, कणकवली – २५०, कुडाळ – १८६, मालवण – २४७, सावंतवाडी – १६९, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ७.
………….

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply