रत्नागिरी जिल्ह्यात नवे ३२२ करोनाबाधित, १७६ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२६ जुलै) नवे ३२२ करोनाबाधित रुग्ण आढळले, तर १७६ जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६५ हजार ४९३ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९३.२७ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा –
आज आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या सहा हजार २४६ नमुन्यांपैकी सहा हजार ३२ अहवाल निगेटिव्ह, तर २१४ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या एक हजार ६६९ पैकी एक हजार ५६१ अहवाल निगेटिव्ह, तर १०८ पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून ३२२ पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७० हजार २२१ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ८५ हजार ९२ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज दोन हजार ७२४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ९२५, तर लक्षणे असलेले ७९९ रुग्ण आहेत. एक हजार १२६ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ६९७, डीसीएचसीमधील ४५२, तर डीसीएचमध्ये ३४७ रुग्ण उपचार घेत आहेत. बाधितांपैकी १८२ जण ऑक्सिजनवर, ८६ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज आधीच्या ६ आणि आजच्या दोन अशा एकूण ८ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. आजचा मृत्युदर २.८५ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार ४ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – मंडणगड २९, दापोली १७९, खेड १८०, गुहागर १४९, चिपळूण ३८३, संगमेश्वर १८०, रत्नागिरी ६७१, लांजा १०६, राजापूर १२७. (एकूण २००४).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply