सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०४ करोनामुक्त, नवे १९९ बाधित

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२९ जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १९९ नवे करोनाबाधित आढळले, तर २०४ रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील करोनामुक्तांची एकूण संख्या ४४ हजार २९२ झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज आठ जणांच्या दुबार तपासणीसह नवे १९९ करोनाबाधित आढळले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ४८ हजार ७० झाली आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – २०, दोडामार्ग – ५, कणकवली – २६, कुडाळ – ४५, मालवण – ३६, सावंतवाडी – २१, वैभववाडी – २७, वेंगुर्ले – ९, जिल्ह्याबाहेरील २.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३१४, दोडामार्ग ६२, कणकवली ४४८, कुडाळ ६७४, मालवण ४००, सावंतवाडी ३०५, वैभववाडी १६७, वेंगुर्ले १५१, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १६. सक्रिय रुग्णांपैकी १४९ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात कालच्या ४ आणि आजच्या ४ अशा ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २३९ झाली आहे. आजच्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड २, कणकवली १, कुडाळ १, मालवण २, जिल्ह्याबाहेरील २.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५९, दोडामार्ग – ३५, कणकवली – २५७, कुडाळ – १८९, मालवण – २५३, सावंतवाडी – १६९, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply