रत्नागिरी जिल्ह्यात ३१६ करोनामुक्त, नवे २५६ रुग्ण, एकही मृत्यू नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२९ जुलै) नवे २५६ करोनाबाधित रुग्ण आढळले, तर ३१६ जण करोनामुक्त झाले. सलग तिसऱ्या दिवशी नवबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

आतापर्यंत जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६६ हजार ८१५ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९४.०४ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या दोन हजार ९४२ नमुन्यांपैकी दोन हजार ७७७ अहवाल निगेटिव्ह, तर १६५ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन हजार ८५५ पैकी दोन हजार ७६४ अहवाल निगेटिव्ह, तर ९१ पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून २५६ पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७१ हजार ४९ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ३ हजार ९७८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज एक हजार ९९१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ५३१, तर लक्षणे असलेले ४६० रुग्ण आहेत. एक हजार ७३ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४१३, डीसीएचसीमधील २३१, तर डीसीएचमध्ये २२९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १५९ जण ऑक्सिजनवर, ७६ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजचा मृत्युदर २.८७ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार ३३ एवढीच आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३०, दापोली १८०, खेड १८१, गुहागर १५१, चिपळूण ३८७, संगमेश्वर १८०, रत्नागिरी ६८९, लांजा १०६, राजापूर १२९. (एकूण २०३३).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply