सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (३० जुलै) करोनाचे दोन हजार ५४४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत.
सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३४४, दोडामार्ग ६३, कणकवली ४५१, कुडाळ ६८९, मालवण ३७९, सावंतवाडी २८२, वैभववाडी १६९, वेंगुर्ले १५२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १५. सक्रिय रुग्णांपैकी १४८ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत दुबार तपासणी केलेल्या ३ रुग्णांसह १७९ नवे करोनाबाधित आढळले, तर १६४ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ४८ हजार २४६, तर
करोनामुक्तांची एकूण संख्या ४४ हजार ४५६ झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ३५, दोडामार्ग – १, कणकवली – २८, कुडाळ – ५७, मालवण – १९, सावंतवाडी – १०, वैभववाडी – १३, वेंगुर्ले – १३.
आज जिल्ह्यात कालच्या १ आणि आजच्या ४ अशा ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २४४ झाली आहे. आजच्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – कुडाळ २, मालवण २, सावंतवाडी १.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५९, दोडामार्ग – ३५, कणकवली – २५७, कुडाळ – १९१, मालवण – २५५, सावंतवाडी – १७०, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
