रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (९ ऑगस्ट) करोनाबाधितांच्या संख्येत काहीशी, तर करोनामुक्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली, तर मृतांची टक्केवारी स्थिर आहे.
आज १०६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर दुपटीहून अधिक म्हणजे २५८ रुग्ण करोनामुक्त झाले.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ६९ हजार १३४ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९४.५१ झाली आहे.
आज आढळलेल्या नव्या ११५ करोनाबाधित रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या चार हजार ६५ नमुन्यांपैकी तीन हजार ९८७ अहवाल निगेटिव्ह, तर ७८ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या एक हजार ५९३ पैकी एक हजार ५५६ अहवाल निगेटिव्ह, तर ३७ पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून ११५ पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७३ हजार १४८ झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ६३ हजार ८९७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज एक हजार ७६३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ३८२, तर लक्षणे असलेले ३८१ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या घटली असून आज ८४७ जण गृह विलगीकरणात, ९१६ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असून १०६ रुग्णांची पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ५३५, डीसीएचसीमधील १५८, तर डीसीएचमध्ये २२३ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १२५ जण ऑक्सिजनवर, ७५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
यापूर्वीच्या १ आणि आजच्या २ अशा एकूण ३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील ३.१५ हा मृत्युदर घटून तो २.९३ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार १४५ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या एक हजार ७९७ (८३.७८ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७६७ (३५.७६ टक्के) आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३२, दापोली १८४, खेड १८६, गुहागर १५४, चिपळूण ४१०, संगमेश्वर १८७, रत्नागिरी ७३६, लांजा ११५, राजापूर १४१. (एकूण २१४५).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
