सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाधितांपेक्षा तिपटीहून अधिक रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१० ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार नव्या बाधितांपेक्षा तिपटीहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले.

आज ३७५ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले. त्यांच्यासह आतापर्यंत ४६ हजार १७४ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात २ हजार ५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज जिल्ह्याबाहेरील लॅबमधील तिघांच्या तपासणीसह आणखी १०५ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ४९ हजार ५०७ झाली आहे.

जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १८, दोडामार्ग ५, कणकवली १५, कुडाळ २२, मालवण १०, सावंतवाडी २८, वैभववाडी ४, वेंगुर्ले ६. सक्रिय रुग्णांपैकी ८० रुग्ण ऑक्सिजनवर तर २७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २८६, दोडामार्ग ५९, कणकवली ३४६, कुडाळ ५२३, मालवण २८७, सावंतवाडी २९४, वैभववाडी ८४, वेंगुर्ले १६५, जिल्ह्याबाहेरील १४.

आज जिल्ह्यात सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २७३ झाली आहे. आज देवगड १, कणकवली २, कुडाळ २ आणि मालवण तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६३, दोडामार्ग – ३५, कणकवली – २६७, कुडाळ – १९७, मालवण – २६१, सावंतवाडी – १७२, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply