रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१० ऑगस्ट) नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक आहे. मृतांची टक्केवारी तिसऱ्या दिवशीही स्थिर आहे.
आज १६६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर दीडपटीहून अधिक म्हणजे २२८ रुग्ण करोनामुक्त झाले.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ६९ हजार ३६२ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९४.६१ झाली आहे.
आज आढळलेल्या नव्या १६६ करोनाबाधित रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या चार हजार ९३९ नमुन्यांपैकी चार हजार ८६८ अहवाल निगेटिव्ह, तर ७१ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन हजार ६१० पैकी दोन हजार ५१५ अहवाल निगेटिव्ह, तर ९५ पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून १६६ पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७३ हजार ३१४ झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ७१ हजार २८० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज एक हजार ७३६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ३६७, तर लक्षणे असलेले ३६९ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ८८७, ७४९ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असून ६६ रुग्णांची पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४८०, डीसीएचसीमधील १५७, तर डीसीएचमध्ये २१२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ११४ जण ऑक्सिजनवर, ७५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
यापूर्वीच्या २ आणि आजच्या ३ अशा एकूण ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील ३.१५ हा मृत्युदर घटून तो २.९३ टक्के झाला आहे. गेले तीन दिवस मृत्युदर स्थिर राहिला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार १५० झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या एक हजार ८०२ (८३.८१ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७७५ (३६.०५ टक्के) आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३३, दापोली १८४, खेड १८६, गुहागर १५४, चिपळूण ४१२, संगमेश्वर १८८, रत्नागिरी ७३७, लांजा ११५, राजापूर १४१. (एकूण २१५०).
Follow Kokan Media on Social Media

