सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवबाधितांपेक्षा चौपट रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१९ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत नव्या बाधितांपेक्षा सुमारे चौपट रुग्ण करोनामुक्त झाले.

आज जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या दोघांसह करोनाचे नवे ८६ रुग्ण आढळले, तर ३२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज बरे झाल्याने घरी गेलेल्या ३२१ जणांसह आतापर्यंत ४७ हजार १६७ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात १ हजार ७५७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५० हजार २३४ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १४, दोडामार्ग ०, कणकवली १५, कुडाळ २६, मालवण ३, सावंतवाडी १९, वैभववाडी ०, वेंगुर्ले ९.

सक्रिय रुग्णांपैकी ८१ रुग्ण ऑक्सिजनवर तर २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २३७, दोडामार्ग ४१, कणकवली ३२५, कुडाळ ४५०, मालवण २५२, सावंतवाडी २४६, वैभववाडी ६२, वेंगुर्ले १२९, जिल्ह्याबाहेरील १५.

आज जिल्ह्यात नापणे (ता. वैभववाडी) आणि सांगवे (ता. कणकवली) येथील प्रत्येकी एका करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय याआधी मरण पावलेल्या ५ रुग्णांची नोंदही आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३०८ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६५, दोडामार्ग – ३५, कणकवली – २७३, कुडाळ – २०५, मालवण – २६३, सावंतवाडी – १७९, वैभववाडी – ७८, वेंगुर्ले – १०१, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply