रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांची संख्या वाढतीच

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१९ ऑगस्ट) १७८ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनामुक्तांची एकूण संख्या आता ७० हजार ७६५ झाली असून ही टक्केवारी ९४.७७ आहे. जिल्ह्यातील करोनामुक्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.

आज नवे ११७ करोनाबाधित आढळले असून त्यांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २९०५ नमुन्यांपैकी २८४९ अहवाल निगेटिव्ह, तर ५६ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या १८२३ पैकी १७६२ अहवाल निगेटिव्ह, तर ६१ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७४ हजार ६७४ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख २० हजार २०५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज १५२० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले १२००, तर लक्षणे असलेले ३२० रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ७९३ आहे. संस्थात्मक विलगीकरणात ७२७ जण असून १५४ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४०७, डीसीएचसीमधील १२७, तर डीसीएचमध्ये १९३ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १४२ जण ऑक्सिजनवर, ७३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज ३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ३.१५ टक्के होता. या आठवड्यात तो २.९९ टक्के झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.२० टक्के आहे.
जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २२३५ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १८७२ (८३.७६ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७९९ (३५.७५ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३४, दापोली १९५, खेड १९३, गुहागर १५८, चिपळूण ४३४, संगमेश्वर १९५, रत्नागिरी ७६०, लांजा ११८, राजापूर १४८. (एकूण २२३५).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply