सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाची स्थिती सुधारण्याची चिन्हे

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाची स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सातत्याने १०० पेक्षा कमी नवे बाधित आणि बाधितांपेक्षा अधिक करोनामुक्त होणारे रुग्ण ही जिल्ह्याची सकारात्मक स्थिती आहे.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (२७ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंत करोनाचे ५१ नवबाधित आढळले, तर ९६ जण करोनामुक्त झाले. एकाच्या जिल्ह्याबाहेरील लॅबमधील तपासणीसह आज नवे ५२ करोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५० हजार ६५१ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड २, दोडामार्ग ४, कणकवली ११, कुडाळ १२, मालवण १३, सावंतवाडी ८, वैभववाडी १, वेंगुर्ले १.

सक्रिय रुग्णांपैकी ६८ रुग्ण ऑक्सिजनवर तर १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १६७, दोडामार्ग ५३, कणकवली ३२३, कुडाळ ३७०, मालवण २३९, सावंतवाडी १८६, वैभववाडी ६२, वेंगुर्ले ९९, जिल्ह्याबाहेरील १५.

आज जिल्ह्यात ३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच याआधी मरण पावलेल्या एका रुग्णाचीही नोंद आज झाली. त्यांचा तपशील असा – कुडाळ २, मालवण १, सावंतवाडी १.

जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३४७ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६७, दोडामार्ग – ३७, कणकवली – २७८, कुडाळ – २१७, मालवण – २७०, सावंतवाडी – १८५, वैभववाडी – ८०, वेंगुर्ले – १०४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply