सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे ५४ रुग्ण, ३३ जण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (२८ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंत करोनाचे ५४ नवबाधित आढळले, तर ३३ जण करोनामुक्त झाले.

एका रुग्णाच्या जिल्ह्याबाहेरील लॅबमधील तपासणीसह आज नवे ५४ करोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५० हजार ७०५ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६, दोडामार्ग ०, कणकवली ९, कुडाळ ५, मालवण ६, सावंतवाडी २४, वैभववाडी २, वेंगुर्ले २.

सक्रिय रुग्णांपैकी ६४ रुग्ण ऑक्सिजनवर तर १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १७२, दोडामार्ग ५०, कणकवली ३३०, कुडाळ ३६४, मालवण २४३, सावंतवाडी २०५, वैभववाडी ६४, वेंगुर्ले ८८, जिल्ह्याबाहेरील ९.

आज जिल्ह्यात १ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच याआधी मरण पावलेल्या तिघा रुग्णांचीही नोंद आज झाली. त्यांचा तपशील असा – दोडामार्ग १, कुडाळ ३.

जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३५१ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६७, दोडामार्ग – ३८, कणकवली – २७८, कुडाळ – २२०, मालवण – २७०, सावंतवाडी – १८५, वैभववाडी – ८०, वेंगुर्ले – १०४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply