रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांच्या टक्केवारीत किंचित घट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २८ ऑगस्ट) करोनामुक्तांच्या टक्केवारीत कालच्या तुलनेत किंचित घट झाली. करोनामुक्तांपेक्षा नवबाधितांची वाढलेली संख्या आणि चाचण्यांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे करोनामुक्तांच्या टक्केवारीत घट नोंदविली गेली.

आज ७८ रुग्ण करोनामुक्त झाले, तर १४१ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७२ हजार १५४ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.४८ एवढी आहे. (काल ती ९५.५५ टक्के होती.)

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या १४१ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ४०७२ नमुन्यांपैकी ३९९० अहवाल निगेटिव्ह, तर ८२ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या २०७७ पैकी २०१८ अहवाल निगेटिव्ह, तर ५९ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७५ हजार ५७४ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ५२ हजार ९८१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज १०३८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ७५८, तर लक्षणे असलेले २८० रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४९७ आहे. संस्थात्मक विलगीकरणात ५४१ रुग्ण असून ८३ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही.

अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले २६१, डीसीएचसीमधील ११६, तर डीसीएचमध्ये १६४ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ११७ जण ऑक्सिजनवर, ६२ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आधीच्या ९ आणि आजच्या ६ अशा एकूण १५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ३.६६ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०४ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर १.४५ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २२९९ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १९२८ (८३.८६ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ८१२ (३५.३२ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३४, दापोली २०३, खेड २०४, गुहागर १६३, चिपळूण ४४८, संगमेश्वर २०१, रत्नागिरी ७७३, लांजा १२३, राजापूर १५०. (एकूण २२९९).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply