करोनाच्या परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आश्वासक सुधारणा

सिंधुदुर्गनगरी : बाधितांच्या संख्येत घट, करोनामुक्तांची वाढ आणि मृत्यूचे कमी झालेले प्रमाण यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या स्थितीत आश्वासक सुधारणा दिसू लागली आहे.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (४ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंत करोनाचे ३८ नवबाधित आढळले. त्यामध्ये जिल्ह्याबाहेरील लॅबमधील तपासणीतील तिघांचा समावेश आहे. आज ४५ जण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५१ हजार १७ झाली आहे.

जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग ०, कणकवली ६, कुडाळ ११, मालवण ३, सावंतवाडी ११, वैभववाडी २, वेंगुर्ले ३, जिल्ह्याबाहेरील १.

जिल्ह्यात सध्या १४१५ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ४७ रुग्ण ऑक्सिजनवर तर १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १७७, दोडामार्ग ५४, कणकवली २२७, कुडाळ ३५७, मालवण २३५, सावंतवाडी १९६, वैभववाडी ५१, वेंगुर्ले ९७, जिल्ह्याबाहेरील २१.

आज जिल्ह्यात मळगाव (सावंतवाडी) येथील एका करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३७१ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६९, दोडामार्ग – ३९, कणकवली – २८१, कुडाळ – २२५, मालवण – २७५, सावंतवाडी – १८८, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply