रत्नागिरीत आज ७५ नवे रुग्ण; ११६ जण करोनामुक्त


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ११ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार ११६ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ७५ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७३ हजार २७३ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.३२ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ७५ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २४१२ नमुन्यांपैकी २३५० अहवाल निगेटिव्ह, तर ६२ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १८२३ पैकी १८१० अहवाल निगेटिव्ह, तर १३ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७६ हजार ८७२ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख एक हजार ९६७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज ९२८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ५७६, तर लक्षणे असलेले ३५२ रुग्ण आहेत.

गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ५२२ आहे, तर ४०६ जण संस्थात्मक विलगीकरणात असून ३०१ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही.

अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ५४, डीसीएचसीमधील १५१, तर डीसीएचमध्ये २०१ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ९९ जण ऑक्सिजनवर, ४३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.३ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०८ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३७० झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३५, दापोली २१२, खेड २१७, गुहागर १६६, चिपळूण ४६३, संगमेश्वर २०४, रत्नागिरी ७९२, लांजा १२४, राजापूर १५७. (एकूण २३७०).

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply