सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१२ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत नवे २३ करोनाबाधित आढळले, तर ३ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी हा अहवाल दिला आहे. त्यानुसार आज जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या दोघांसह एकूण २३ नवबाधित आढळले.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५१ हजार २२६ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७, दोडामार्ग ३, कणकवली ४, कुडाळ ३, मालवण ३, सावंतवाडी ३. वैभववाडी आणि वेंगुर्ले या तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात सध्या १३२२ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ३२ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १५७, दोडामार्ग ४५, कणकवली २३०, कुडाळ ३२८, मालवण २२१, सावंतवाडी १८४, वैभववाडी ४७, वेंगुर्ले ८९, जिल्ह्याबाहेरील २१.
आज जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदवला गेला नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १३७८ आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७०, दोडामार्ग – ३९, कणकवली – २८५, कुडाळ – २२६, मालवण – २७५, सावंतवाडी – १८९, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
