रत्नागिरीत आज ७० नवे रुग्ण; २० जण करोनामुक्त


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १२ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार २० रुग्ण करोनामुक्त झाले, तर ७० नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७३ हजार २९३ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.२६ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ७० करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ६१८ नमुन्यांपैकी ५९१ अहवाल निगेटिव्ह, तर २७ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या २२३५ पैकी २१९२ अहवाल निगेटिव्ह, तर ४३ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७६ हजार ९४२ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख चार हजार ७५० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज ९३४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ७०६, तर लक्षणे असलेले २२८ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ५३३ आहे, तर ४०१ जण संस्थात्मक विलगीकरणात असून ३४३ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही.
अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले १७३, डीसीएचसीमधील १४६, तर डीसीएचमध्ये ८२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १३२ जण ऑक्सिजनवर, ४२ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.३ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०८ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३७२ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३५, दापोली २१३, खेड २१७, गुहागर १६६, चिपळूण ४६४, संगमेश्वर २०४, रत्नागिरी ७९२, लांजा १२४, राजापूर १५७. (एकूण २३७२).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply