सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २७ नवे करोनाबाधित; २३ जण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१७ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या एकासह नवे २७ करोनाबाधित आढळले, तर २३ रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५१ हजार ३२८ झाली आहे.जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३, दोडामार्ग ४, कणकवली १, कुडाळ ६, मालवण ५, सावंतवाडी ४, वैभववाडी ३. जिल्ह्यात सध्या १२७५ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ४५ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १६०, दोडामार्ग ४६, कणकवली २२६, कुडाळ ३२२, मालवण २३०, सावंतवाडी १४३, वैभववाडी ४८, वेंगुर्ले ८०, जिल्ह्याबाहेरील २०.सांगवे (कणकवली) आणि पुरळ (देवगड) येथील प्रत्येकी एका पुरुषाचा आज करोनामुळे मृत्यू झाला. या दोघांसह जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १३८५ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७२, दोडामार्ग – ३९, कणकवली – २८६, कुडाळ – २२६, मालवण – २७६, सावंतवाडी – १९१, जिल्ह्यातील८१, वेंगुर्ले – १०५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी हा अहवाल दिला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply