सिंधुदुर्गात ४४ जण करोनामुक्त; ६९ नवे रुग्ण; तीन मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२४ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत ६९ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ४४ जण करोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत तीन करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज नवे ६९ करोनाबाधित आढळले, तर ४४ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५१ हजार ६२८ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३, दोडामार्ग ६, कणकवली १३, कुडाळ १४, मालवण ७, सावंतवाडी २२, वैभववाडी १, वेंगुर्ले ३. जिल्ह्यात सध्या १२२४ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ४२ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १२९, दोडामार्ग ५२, कणकवली २१४, कुडाळ ३०२, मालवण २१९, सावंतवाडी १६५, वैभववाडी ४१, वेंगुर्ले ९१, जिल्ह्याबाहेरील ११.

आज जिल्ह्यात तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाला. कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील ६७ वर्षांचा पुरुष, कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील ४५ वर्षांची महिला आणि देवगड तालुक्यातील दाभोळे येथील ६३ वर्षांची महिला अशा तिघांचा आज मृत्यू झाला. पहिल्या रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाब, तर उर्वरित दोघींना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १३९४ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७४, दोडामार्ग – ३९, कणकवली – २८९, कुडाळ – २२७, मालवण – २७७, सावंतवाडी – १९२, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply