रत्नागिरीत आज ८२ नवे रुग्ण; ५१ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २५ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार ५१ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ८२ नवे करोनाबाधित आढळले.

जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७४ हजार ५४० झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.९६ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ८२ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ११०० पैकी १०६३ अहवाल निगेटिव्ह, तर ३७ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या २०७० नमुन्यांपैकी २०२५ अहवाल निगेटिव्ह, तर ४५ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७७ हजार ६८२ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ४४ हजार ५३७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ७२७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ४७२, तर लक्षणे असलेले २५५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४३२ आहे. डुप्लिकेट एंट्री असलेली १५१ जणांची एंट्री कोविड पोर्टलवरून कमी करण्यात आली. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४०, डीसीएचसीमधील १००, तर डीसीएचमध्ये १५५ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ६७ जण ऑक्सिजनवर, २६ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या तीन आणि आजच्या दोन अशा पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४.०५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१० टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.२८ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४१५ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१८, खेड २२१, गुहागर १६७, चिपळूण ४७३, संगमेश्वर २१०, रत्नागिरी ८०३, लांजा १२४, राजापूर १६०. (एकूण २४१५).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply