coronavirus

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवबाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (९ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत करोनाचे नवे ४० रुग्ण आढळले, तर ५१ रुग्ण करोनामुक्त झाले. या काळात एका रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला.

जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या तिघांसह आज नवे ४० करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ४६८ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६, दोडामार्ग २, कणकवली ७, कुडाळ ११, मालवण ३, सावंतवाडी ७, वैभववाडी ०, वेंगुर्ले ४. ही माहिती जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात सध्या ९०१ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ४६ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ९२, दोडामार्ग ४६, कणकवली १५५, कुडाळ २१३, मालवण १४२, सावंतवाडी १३४, वैभववाडी १९, वेंगुर्ले ८७, जिल्ह्याबाहेरील १३.

आज पडेल (देवगड) येथील एका पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४३१ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७८, दोडामार्ग – ४२, कणकवली – २९५, कुडाळ – २३८, मालवण – २८५, सावंतवाडी – १९६, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १०६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply