सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५७ नवे करोनाबाधित; २ करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ५७ रुग्ण आढळले, तर केवळ २ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार आज (६ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या ५ जणांसह एकूण ५७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या १८९ झाली आहे. त्यापैकी ६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

आतापर्यंत ५१ हजार ७६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ५३ हजार ४१८ रुग्ण बाधित आढळले, तर आतापर्यंत १४६५ रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १७, दोडामार्ग २, कणकवली ८, कुडाळ ९, मालवण ८, सावंतवाडी ६, वैभववाडी १, वेंगुर्ले ५, जिल्ह्याबाहेरील १.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ३१, दोडामार्ग ९, कणकवली ३३, कुडाळ ३५, मालवण ३२, सावंतवाडी २०, वैभववाडी ३, वेंगुर्ले २२, जिल्ह्याबाहेरील ४.

आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६५ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३००, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply