सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या नवबाधितांपेक्षा १.७ पट रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे २२१ रुग्ण आढळले, तर १.७ पट म्हणजे ३७६ रुग्ण करोनामुक्त झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात देण्यात आली आहे.

आज (दि. २० जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात १८५ तर जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या ३६ जणांसह एकूण २२१ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या रुग्णांपैकी १६ रुग्ण ऑक्सिजनवर असून ८ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात ५५ हजार ३९६ रुग्ण बाधित आढळले, तर ५२ हजार ५५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ हजार ४७२ रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड २६, दोडामार्ग १९, कणकवली २६, कुडाळ ४२, मालवण १६, सावंतवाडी ४८, वैभववाडी १४, वेंगुर्ले २७, जिल्ह्याबाहेरील ३.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ७२, दोडामार्ग १३६, कणकवली २४२, कुडाळ ३२२, मालवण १३४, सावंतवाडी २४५, वैभववाडी ६०, वेंगुर्ले ११२, जिल्ह्याबाहेरील ९.

आज एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४७२ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८१, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३०१, कुडाळ – २४५, मालवण – २९०, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – ११२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply