रत्नागिरी जिल्ह्यात नवे २२८ करोनाबाधित, २१२ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २० जानेवारी) करोनाचे नवे २२८ रुग्ण आढळले, तर २१२ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,२७५ झाली आहे. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८२ हजार १५५ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७८ हजार ३८५ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९५.४१ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ६१८ पैकी ५०४ निगेटिव्ह, तर ११४ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या १,१८९ पैकी १,०७५ नमुने निगेटिव्ह, तर ११४ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ८७ हजार ६९९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १,२७५ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले १,०३३, तर लक्षणे असलेले २४२ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १००५ असून, संस्थात्मक विलगीकरणात २७० जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ११७, तर डीसीएचमध्ये १२५ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये २८ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात ६ रुग्ण दाखल आहेत.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९५ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०४ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७५, चिपळूण ४८१, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८३१, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९५).

लसीकरणाची स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात १९ जानेवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ९० सत्रे पार पडली. त्यात ९८३ जणांनी लशीचा पहिला, तर ३,५७२ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण ४,५५५ जणांचे लसीकरण झाले. १९ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४३ हजार ६३० जणांचा पहिला, तर ७ लाख ९६ हजार १२ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. त्यामध्ये १५ ते १७ वयोगटातील ६४८, तर बूस्टर डोस घेतलेल्या २२० जणांचा समावेश आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply