coronavirus

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या नवबाधितांपेक्षा संख्येत काहीशी घट

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे १७६ रुग्ण आढळले. कालच्या तुलनेत नव्या रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. आज १८६ रुग्ण करोनामुक्त झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात देण्यात आली आहे.

आज (दि. २२ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात १७३ तर दुबार तपासणी केलेल्या ३ जणांसह एकूण १७६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १,३३४ रुग्णांपैकी २६ रुग्ण ऑक्सिजनवर असून ९ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात ५५ हजार ७८० रुग्ण बाधित आढळले, तर ५२ हजार ९७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज पूर्वीच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ४७४ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १४, दोडामार्ग १३, कणकवली २१, कुडाळ ३३, मालवण २६, सावंतवाडी ३८, वैभववाडी ९, वेंगुर्ले १७, जिल्ह्याबाहेरील २.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ७०, दोडामार्ग १३५, कणकवली १८३, कुडाळ ३५८, मालवण १२४, सावंतवाडी २५५, वैभववाडी ७९, वेंगुर्ले १२१, जिल्ह्याबाहेरील ९.

पूर्वी मृत्यू झालेल्या कणकवली तालुक्यातील एका रुग्णाची आज नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १,४७४ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८१, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३०२, कुडाळ – २४६, मालवण – २९०, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – ११२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply