सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या रुग्णसंख्येत घट, दोघांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांमध्ये कालच्यापेक्षाही आज घट झाली आहे. आज करोनाचे नवे १३ रुग्ण आढळले, तर ४१ रुग्ण करोनामुक्त झाले. आज दोघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (दि. ११ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात १३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ३३० रुग्णांपैकी ३ रुग्ण ऑक्सिजनवर एकही रुग्ण चिंताजनक अवस्थेत नाही. आज ४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार २२२ रुग्ण बाधित आढळले, तर ५५ हजार ३७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. दोघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाल्याने आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ५१९ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ०, दोडामार्ग २, कणकवली २, कुडाळ २, मालवण ४, सावंतवाडी १, वैभववाडी ०, वेंगुर्ले २, जिल्ह्याबाहेरील ०.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २४, दोडामार्ग १२, कणकवली ३७, कुडाळ ६३, मालवण ६२, सावंतवाडी ५७, वैभववाडी ११, वेंगुर्ले ५६, जिल्ह्याबाहेरील ८.

जिल्ह्यात आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यांचा तपशील असा – कुडाळमधील ७९ वर्षीय पुरुष (उच्च रक्तदाब), कातवड (मालवण) येथील ६७ वर्षीय पुरुष (उच्च रक्तदाब, मूत्रपिंड विकार). त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १,५१९ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८४, दोडामार्ग – ४६, कणकवली – ३१८, कुडाळ – २५३, मालवण – २९८, सावंतवाडी – २१४, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply