Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

उन्हाळी सुट्टीसाठी नागपूर-मडगाव-नागपूर विशेष एक्स्प्रेस रेल्वे सुरू

Advertisements

रत्नागिरी : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यात आली आहे. ही साप्ताहिक गाडी येत्या १२ जूनपर्यंत धावणार आहे.

०१२०१ क्रमांकाची गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरून दर शनिवारी दुपारी १५.५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी मडगाव येथे सायंकाळी १७.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाकरिता ०१२०२ क्रमांकाची विशेष गाडी दर रविवारी मडगाव स्थानकावरून रात्री २०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी आणि थिवी स्थानकांवर थांबणार आहे. गाडीत रेल्वे सेकंड सीटिंग, वातानुकूलित द्वितीय, तृतीय वर्ग, वातानुकूलित वर्ग, शयनयान असेल. गाडी पूर्णपणे आरक्षित असेल.

ही गाडी कायमस्वरूपी सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस वैभव बहुतुले यांनी डिव्हिजन रिजनल मॅनेजर श्रीमती ॠचा खरे यांच्याकडे केली आहे. सध्या सुरू झालेल्या हंगामी गाडीचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version