रत्नागिरी : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यात आली आहे. ही साप्ताहिक गाडी येत्या १२ जूनपर्यंत धावणार आहे.
०१२०१ क्रमांकाची गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरून दर शनिवारी दुपारी १५.५० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी मडगाव येथे सायंकाळी १७.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाकरिता ०१२०२ क्रमांकाची विशेष गाडी दर रविवारी मडगाव स्थानकावरून रात्री २०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी आणि थिवी स्थानकांवर थांबणार आहे. गाडीत रेल्वे सेकंड सीटिंग, वातानुकूलित द्वितीय, तृतीय वर्ग, वातानुकूलित वर्ग, शयनयान असेल. गाडी पूर्णपणे आरक्षित असेल.
ही गाडी कायमस्वरूपी सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस वैभव बहुतुले यांनी डिव्हिजन रिजनल मॅनेजर श्रीमती ॠचा खरे यांच्याकडे केली आहे. सध्या सुरू झालेल्या हंगामी गाडीचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड