वृक्षवल्ली : सर्वंकष रोपवाटिका

आम्ही प्रामुख्याने नर्सरी व्यवसायात असून आम्हाला तीस वर्षांचा अनुभव आहे. १९९६ पासून सुरुवात झालेला हा व्यवसाय काळानुरूप बदलत गेला. आंबा, काजू, कोकम, काळीमिरी, चिकू, पेरू, बिनचिकाचा कापा फणस, स्टारफ्रूट, बुश-काळीमिरी यांची कलमे तयार करतो.

विशेष म्हणजे या सर्वांचे मातृवृक्षांची (मदर प्लँट) आमची स्वतःची लागवड आहे. त्यामुळे ग्राहकांना जातिवंत कलमे आपल्याला खात्रीशीरपणे देता येतात. आमची सोनचाफा ही खासियत आहे. अतिशय मनमोहक सुवास असणारी, सौंदर्या जातीची, वर्षभर फुलणारी सोनचाफ्याची कलमे तयार केली जातात. ही कलमे खरेदी करण्यासाठी संपूर्ण भारतातून ग्राहक येतात आणि ही कलमे संपूर्ण देशभर विविध ठिकाणी पाठवली जातात.

बदलत्या काळाशी सुसंगत अशी सजावटीसाठी आवश्यक असणारी झाडे, कुंड्या, खते-औषधे, मिनिएचर गार्डन, व्हर्टिकल गार्डन आपण वृक्षवल्लीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. उत्पादनांच्या दर्जामुळे वृक्षवल्ली ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.

मी आणि माझी पत्नी दोघांनीही अ‍ॅग्रिकल्चर क्षेत्रामध्ये पदवी प्राप्त केली असल्यामुळे, झाडांची शास्त्रोक्त माहिती आम्ही ग्राहकांना देतो.

आम्ही सतत नवनवीन कल्पना राबवत असतो. एकाच प्रकारची झाडे बघून तुम्हाला कंटाळा येतो किंवा झाडांचा मेंटेनन्स राखण्यास तुमच्याकडे वेळ मिळत नाही. यावर उपाय म्हणून प्लांट लायब्ररी ही संकल्पना आम्ही घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये संपूर्ण महिनाभर कुंड्या आपणास भाड्याने मिळतील आणि महिन्यानंतर कुंड्या बदलण्यात येतील. यासाठी ज्यांची ऑफिसेस आहेत, क्लिनिक्स आहेत, हॉटेल व्यावसायिक, फॅक्टरी आउटलेट ओनर्स, फ्रँचाईज ओनर्स, ब्युटी पार्लर किंवा ज्यांना घर, गॅलरी सजवायची आहे, अशा सर्वांनीच ‘वृक्षवल्ली’शी अवश्य संपर्क साधावा.

  • प्रतीक गंगाराम कळंबटे (बीएस्सी, हॉर्टिकल्चर)
    प्रतीक नर्सरी, नरबे, ता. रत्नागिरी.
    वृक्षवल्ली, साळवी स्टॉप, नाचणे लिंक रोड, रत्नागिरी.
    (संपर्क : प्रतीक कळंबटे – 9665299329, माधुरी कळंबटे – 9561994881)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply