वयाची अट नाही, परीक्षाही नाही, तरीही रोजगार!

पारंपरिक कला-शिक्षण आणि प्रत्यक्ष मागणीमध्ये निर्माण झालेली दरी मिटविण्यासाठी आणि कला महाविद्यालयातील शिक्षणाला मुकणार्‍या नॉनआर्ट पार्श्वभूमीच्या हजारो मुलांना क्रिएटिव्ह डायरेक्टर बनवणे ही अशक्य वाटणारी किमया गेल्या 20 वर्षांपासून सात्यत्याने मंथन आर्ट स्कूलच्या माध्यमातून प्रा. शशिकांत गवळी करत आहेत. याच मंथनची शाखा रत्नागिरीत सुरू झाली आहे.

मुंबईतील जे. जे. स्कूल ऑम आर्टमध्ये शिक्षण पूर्ण करून रहेजा स्कूल ऑफ आर्ट या महाविद्यालयात 7 वर्षे शशिकांत गवळी यांनी अध्यापन केले. केवळ चित्रकला जमते, म्हणून विद्यार्थी या अप्लाइड आर्ट क्षेत्रात येतील आणि यशस्वी होतील, हा भ्रम असल्याचे गवळी यांच्या लक्षात आले. त्यासाठी खूप बदल होणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन प्रचलित कला-शिक्षण पद्धतीला दोष देत बसण्यापेक्षा एक ठोस पर्याय उभा करणे गरजेचे होते. तो पर्याय गवळी यांनी मंथन आर्ट स्कूलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला.

वयाची अट नाही, परीक्षा नाही, मागेल त्याला कला-शिक्षण आणि नोकरीची 100 टक्के खात्री देणारा एक अभिनव प्रयोग मंथन आर्ट स्कूलच्या रूपाने यशस्वी झाला. हजारो मुलांचे जाहिरात कंपनी आणि कलेच्या इतर क्षेत्रात क्रिएटिव्ह करिअर घडवले. कलेसाठी जीवन हे आदर्श वाटत असले तरी जीवनासाठी कला हे वास्तव आहे. या विचाराने मुंबईत एका बागेतील झाडाखाली 6 विद्यार्थ्यांना घेऊन सुरवात करत गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांच्या आदर्श घेऊन गुरुकुल शिक्षण पद्धतीचे हे आर्ट स्कूल आज ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचावे म्हणून सातत्याने प्रयत्न चालू आहेत. मुलांचे वय, कौशल्य, आर्थिक क्षमता लक्षात घेऊन एक-दोन वर्षांत विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहील, असा कल्पक अभ्यासक्रम प्रा. गवळी यांनी तयार केला.

महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार 2014-15 मध्ये आणि 38 वेळा त्यांच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचे राज्य पुरस्कार मिळाले. हीच त्यांच्या यशाच्या कल्पक दृष्टिकोनाची पावती आहे. आज केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणात सुचविलेले बदल त्यांनी 20 वर्षांपूर्वीच सुरू केले आणि 3 हजार मुलांचे करिअर घडविले आहे.

अशा प्रकारच्या क्रिएटिव्ह क्षेत्रातील करिअर संधी कोकणातील विद्यार्थ्यांना मिळावी आणि शास्त्रशुद्ध तांत्रिक शिक्षण रत्नागिरीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी मिळावे, यासाठी मुंबईतील प्रख्यात आर्ट स्कूल आपल्या कोकणात आणण्याचा छोटासा प्रयत्न प्रा. संदेश पालये यांनी केला आहे. फाइन आर्ट, फोटोग्राफी, एडिटिंग, फिल्म मेकिंग, ग्राफिक डिझाइन, व्हीएफएक्स आणि सीजी, अ‍ॅनिमेशन, जाहिरात, प्रिंटिंग इत्यादी कला क्षेत्राची ओळख क्रिएटिव्ह करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून ते करत आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या कलाक्षेत्रात करिअर करावे आणि कलाक्षेत्र अधिक दर्जेदार बनवावे, हा यामागचा मानस आहे.

कोकणातील, रत्नागिरीतील मंथन आर्ट स्कूलची पहिली बॅच सुरू झाली असून अप्लाइड आर्ट, मीडिया कोर्सचे शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

  • संदेश पालये,
    मंथन स्कूल ऑफ आर्ट,
    मुरलीधर मंदिरासमोर,
    खालची आळी, रत्नागिरी
    (संपर्क : 95270 08676)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply