रत्नागिरी : येथील शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार येत्या २५ जून रोजी करण्यात येणार असून त्यासाठी आपल्या नातवंडांची माहिती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्या सभासदांच्या नातवंडांनी नुकत्याच संपलेल्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सुयश मिळविले असेल, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले असतील अथवा कोणत्याही पदवी, पदविका परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविले असेल अशा आपल्या नातवंडांची माहिती त्यांच्या आजी-आजोबांनी म्हणजेच शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी पाठवावी. ही माहिती येत्या २० जूनपर्यंत ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात लेखी स्वरूपात पाठवावी.
गुणवान नातवंडांचा सत्कार रविवार, २५ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता संघाच्या शिवाजीनगर येथील सभागृहात करण्यात येणार आहे. या समारंभाला गुणवान विद्यार्थ्यांसोबत सभासदांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
