रत्नागिरीतील ब्रिज स्पर्धेत अॅमरोना संघ विजयी

यजमान रत्नागिरीला तिसरा क्रमांक

रत्नागिरी : इंडियन ऑइल आणि रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय डुप्लिकेट ब्रिज स्पर्धेत मुंबईच्या अॅमरोना संघाने विजेतेपद पटकावले. रत्नागिरीच्या संघाला तिसरा क्रमांक मिळाला.

माळ नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात दोन दिवस या स्पर्धा पार पडल्या. त्यात महाराष्ट्र, गोव्यातील ८० खेळाडू सहभागी झाले होते. यातील विजेत्या संघाला पुढील स्पर्धेसाठी संधी मिळाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक दीपकशेठ गद्रे, इंडियन ऑइलचे महाप्रबंधक सुरेश अय्यर, ज्येष्ठ खेळाडू डॉ. गुणेश दीक्षित यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवशी डुप्लिकेट स्पर्धेत १० डावांचे ६ राउंड झाले. त्यातून ६ संघ सुपरलीगसाठी पात्र झाले. या ६ संघांचे ५ राउंड झाल्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. विजेत्या

मुंबईच्या अॅमरोना संघात जे. के. भोसले, अमोल देशमुख, श्रीधरन दक्षिणदास हे खेळाडू होते. मुंबईच्या अजिंक्य संघाने उपविजेतेपद आणि यजमान रत्नागिरीच्या संघाने तृतीय स्थान पटकावले. या संघात मोहन दामले, अभय लेले आणि अभय पटवर्धन, माधव आगाशे हे खेळाडू होते. ठाण्याचा समाधान संघ चौथ्या, बोरिवली संघ पाचव्या क्रमांकावर राहिला. इंडियन ऑइलच्या संघाने सहाव्या क्रमांकावर यश मिळवले.

ओपन पेअर्स स्पर्धेत २० संघांनी भाग घेतला. ओपन पेअर्स स्पर्धेचे विजेतेपद अरुण बापट आणि कौस्तुभ बेंद्रे यांनी, तर पुण्याचे अविनाश केळकर व सचिन कानगो यांनी उपविजेतेपद मिळवले. पुण्याची गुजराथी-भिडे जोडी तृतीय स्थानावर राहिली. स्पर्धेचे बक्षीस वितरण इंडियन ऑइलचे सुनील आणि संस्थेचे अध्यक्ष उमाकांत सनगर यांच्या हस्ते झाले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनचे सचिव सचिन मुळे, कार्यवाह सचिन जोशी, चिंतामणी दामले आदींसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply