पु. ल. देशपांडे कला अकादमीतर्फे मोफत सादरीकरणाची संधी

मुंबई : येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने नवोदित कलाकारांसाठी मोफत सादरीकरणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.

‘पु. ल. कट्टा’ या उपक्रमाकरिता नवोदित कलाकारांना सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. ‘ओपन कॅफे’ प्रकारात वर्षाऋतू आणि श्रावणमास या संकल्पनेवर नृत्य, वादन, समूहगान, गायन, प्रहसने (स्किट्स) सादर करता येऊ शकेल. याची निवड प्रक्रिया असून इच्छुकांनी ८१६९८८२८९८ या क्रमांकावर ३१ जुलै २३ पूर्वी आपली कलाकृती व्हिडीओ स्वरूपात पाठवावी.

निवड झालेल्या कलाकृतींना मोफत व्यासपीठ आणि ध्वनी-प्रकाश यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल. ही योजना कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असल्याने कलाकारांना कोणतेही मानधन दिले जाणार नाही. परंतु सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

प्रत्यक्ष सादरीकरणाचा कार्यक्रम येत्या ५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता होणार असून अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याची आणि उपस्थित राहण्याची विनंती अकादमीच्या वतीने करण्यात आली आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply