राज्यस्तरीय मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धा २५ व २६ ऑगस्टला

रत्नागिरी : तरुणाईच्या परखड विचारांना व्यासपीठ मिळवून देणारी आणि गेली ४० वर्षे राज्यभरात नावलौकिक मिळविलेली मानाची ४१ वी कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा येत्या २५ आणि २६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

स्पर्धा तीन गटांत होणार आहे. ते गट आणि त्यांचे विषय असे – १) माध्यमिक गट – मराठी माध्यम (जिल्हास्तरीय) – भारताची चांद्रयान भरारी, आभासी चलन आणि मी, राजमाता जिजाऊ – संस्कार आईचे, माझे आदर्श. २) कनिष्ठ महाविद्यालयीन गट (जिल्हास्तरीय) -निर्भय भारत आणि युवक, जनविस्फोटाच्या कठड्यावर भारत!, नैतिकतेचे आदर्श – प्रा. मधू दंडवते, नवे शैक्षणिक धोरण आणि पारंपरिक शिक्षण. ३) वरिष्ठ महाविद्यालयीन गट (राज्यस्तरीय) – चाणक्य कुटनीती आणि वर्तमान, हरित ऊर्जा इंधन आणि अर्थकारण, आजच्या साहित्यातील वर्तमानाचे पडसाद, कृत्रिम बुद्धिमत्तेचे मानवी बुद्धिमत्तेवर अधिराज्य! वरीलपैकी एका विषयावर स्पर्धकांनी गटनिहाय बोलावे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांसह दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धकांनी आपला विषय प्रवेश अर्जात नमूद करावा. एका संघात २ स्पर्धक असतील, असे केवळ दोन संघ स्वीकारण्यात येतील. स्पर्धा मराठी माध्यमातून घेतली जाईल. गुणानुक्रमे पहिल्या ५ विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त विषयावर बोलणे बंधनकारक राहील. स्पर्धेसाठी राज्यस्तरीय स्पर्धेकरिता प्रत्येकी १०० रुपये आणि माध्यमिक गटासाठी प्रत्येकी ५० रुपये प्रवेश शुल्क राहील. प्रवेश शुल्क स्पर्धेच्या दिवशी स्वीकारले जाईल. वरिष्ठ आणि कनिष्ठ गटासाठी विषय सादरीकरणासाठी ७ मिनिटे तर माध्यमिक गटासाठी ५ मिनिटे वेळ राहील. उत्स्फूर्त विषयासाठी ३ मिनिटे वेळ दिला जाईल. स्पर्धकाने स्पर्धेवेळी महाविद्यालयाचे
ओळखपत्र जवळ बाळगावे. स्पर्धेसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यास स्पर्धा रद्द करण्याचा अधिकार संयोजन समितीकडे राहील. पूर्वकल्पना दिल्यास बाहेरील विद्यार्थ्यांची निवासाची सोय होईल. स्पर्धकाचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. येत्या १८ ऑगस्टनंतर प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.

अधिक माहितीसाठी माध्यमिक गट – प्रा. निकिता नलावडे (९०९६४५०४७२), प्रा. नाझिया मजगावकर (७३८७५९०१६४), प्रा. संगीता सहानी (८८३०३७२७९६), प्रा. अलमास लांबे (९४०५३२७०५९), कनिष्ठ महाविद्यालय गट – प्रा. प्रकाश पालांडे (९४२०८४२७९९), प्रा. सचिन टेकाळे (९४०३२५७५८१) आणि वरिष्ठ महाविद्यालयीन गट – प्रा. योगेश हळदवणेकर (८३२९१३६९१४), प्रा. सुकुमार शिंदे (९४२३१८९७६१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी केले आहे.

रत्नागिरीतील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात नवनिर्माण शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेला तरुणांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply