रत्नागिरी : येत्या २०२७ पर्यंतच्या पाच वर्षांच्या कार्यकालाकरिता झालेल्या महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या निवडणुकीत अन्य सदस्यांसह प्रदीप भाटकर (उपाध्यक्ष) आणि अजित सावंत (खजिनदार) या रत्नागिरीच्या दोघांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
मुंबईत दादर येथील दादर क्लबमध्ये झालेल्या या निवडणुकीत पालघरचे जितेंद्र शाह यांची पुन्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पुण्याचे भारत देसडला यांनाही दुसऱ्यांदा कार्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. मानद सचिव पदावर मुंबईचे अरुण केदार, खजिनदारपदी अजित सावंत यांचीही खजिनदारपदी दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितिन करंडे यांनी काम पाहिले.
नवी कार्यकारिणी अशी – जितेंद्र शाह (अध्यक्ष, पालघर), भारत देसडला (कार्याध्यक्ष, पुणे), धनंजय साठे (उपाध्यक्ष, सांगली), गिरीश तुळपुळे (उपाध्यक्ष, रायगड), मंजूर अहमद खान (उपाध्यक्ष, जळगाव), प्रदीप भाटकर (उपाध्यक्ष, रत्नगिरी), यतीन ठाकूर (उपाध्यक्ष, मुंबई), अरुण केदार (मानद सचिव, मुंबई), अजित सावंत (खजिनदार, रत्नागिरी), अभिजित मोहिते (मानद सहसचिव, कोल्हापूर), दत्तप्रसाद शेंबेकर (मानद सहसचिव, ठाणे), इक्बाल नबी (मानद सहसचिव, मुंबई उपनगर), केतन चिखले (मानद सहसचिव, मुंबई), योगेश फणसळकर (मानद सहसचिव, सिंधुदुर्ग). कार्यकारिणी सदस्य असे – आनंद खरे (नाशिक), आशुतोष धोडमिसे (पुणे), जितेंद्र दळवी (ठाणे), संतोष चव्हाण (मुंबई उपनगर).


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

